भाजपाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार?

पटोलेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “योग्य वेळी…”
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकतेच भाजपात जाहीर प्रवेश केला. भाजपानेही त्यांना राज्यसभेची उमेदवारी बहाल केली. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयानंतर काँग्रेचे आणखी काही आमदार भाजपात जाणार असा दावा केला जातोय. हा दावा मात्र काँग्रेसने फेटाळला आहे. दरम्यान, याच धांदलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर योग्य निर्णय घेऊ, असे नाना पटोले पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

नाना पोटोले नेमकं काय म्हणाले.
“भाजपाचे अनेक आमदार आमच्या सोबत आहेत. आम्ही जेव्हा हातोडा मारू तेव्हा दिसेल. मात्र सध्या हा विषय महत्त्वाचा नाही. भारत जलाऊ पार्टी म्हणजेच भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र जाळण्याचे पाप केले. भाजपाला महाराष्ट्र जाळण्याचा अधिकार नाही. सध्या भाजपाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र योग्य वेळी त्यावर निर्णय घेऊ,” असे नाना पटोले म्हणाले

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या