बीड हादरलं अपहरण करून हत्या
दिवसाढवळ्या सरपंचाचं अपहरण करून हत्या
पुण्यामध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. असाच काहीसा प्रकार बीडच्या केजमध्ये घडला आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंचाचं भर दुपारी रस्त्यावरून अपहरण केलं गेलं. अपहरणानंतर सरपंचाची हत्याही करण्यात आली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हत्या आणि अपहरण कोणी केलं? याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.