पुणे | देश आज कारगिलवरील विजयाचा २१ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. वर्ष १९९९ रोजी आजच्या दिवशी भारताच्या शूर मुलांनी कारगिलच्या शिखरावरून पाकिस्तानी सैन्याला पाठलाग करत तिरंगा झेंडा फडकवला होता.

भारत आणि पाकिस्तानमध्ये १९९९ मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. ८ मे १९९९ रोजी जेव्हा पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसलेले असताना या युद्धाची सुरुवात झाली होती. कारगिलमध्ये घुसखोरीची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली, जे कारगिलातील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते. याकच्या शोध घेण्याच्या दरम्यान त्यांना संशयास्पद पाक सैनिक दिसून आले. ३ मे रोजी प्रथमच भारतीय सैनिकांना गश्त(फेरी )मारत असताना आढळले की काही लोकं तेथे हालचाल करीत आहे. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टर मध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले.
भारतीय सैन्याने ९ जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या २ चौकीवर ताबा घेतला. त्यानंतर १३ जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने २९ जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या ५०६० आणि ५१०० आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोविला.

११ तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्स वर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतली.
१९९९ मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून २५०००० गोळे आणि रॉकेट डागळे गेले. ३०० पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्स ने दररोज सुमारे ५००० बॉम्बं डागण्यात आले.
२६ जुलै १९९९ रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेल्या ‘ऑपरेशन विजय’ ला यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले. कारगिलची उंची समुद्रतळापासून सुमारे १६००० ते १८००० फूट अशी आहे, अशामध्ये विमानांना उड्डाण करण्यासाठी सुमारे २०००० फुटाच्या उंची वर उड्डाण करावी लागते. कारगिल युद्धात मीराजसाठी निव्वळ १२ दिवसात लेजर गाईडेड बॉम्बं प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली. भारतीय वायू सेनेत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मिग-२७ आणि मिग-२९ विमान वापरण्यात आले होते.

कारगिलच्या टेकड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सुमारे २ लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला यामध्ये सुमारे ५२७ सैनिक हुतात्मा झाले. कारगिल युद्धात राष्ट्र रक्षणासाठी बलिदान दिलेल्या सर्व जवानांना महामेट्रो न्यूजच्या टिम कडून विनम्र अभिवादन 🙏

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या