खासगी रुग्णालयात अग्नितांडव, ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू
तमिळनाडूच्या डिंडीगूल येथील एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.तमिळनाडूच्या डिंडीगूल येथील एका खासगी रुग्णालयात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या भीषण आगीत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ज्यावेळी रुग्णालयाला आग लागली, तेव्हा रुग्णालयात अनेकांवर उपचार सुरू होते. आगीच्या घटनेनंतर उपचाराधिन असणाऱ्या रुग्णांना तातडीनं दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं काम सुरू होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १० च्या सुमारास ही आग लागली होती. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन आणि बचाव दलाचं पथक घटनास्थळी रवाना झालं. दोन्ही दलाकडून तातडीनं बचाव कार्याला सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचं आणि बचावाचं काम सुरू होतं. आगीच्या घटनेनंतर काही वेळातच डिंडीगूलचे जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले. जवळपास तीन तास अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या दुर्दैवी घटनेत ६ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले.