भाजप महायुतीचे उमेदवार आ प्रताप अडसड यांच्या बहिणीवर अज्ञात हल्लेखोरांचा चाकूने हल्ला

मानेपासून हुकले वार

हाताची कटली नस

धामणगाव रेल्वे
धामणगाव विधानसभा मतदार संघातील भाजपा महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहिण सौं अर्चना रोठे वय ४५ यांच्यावर
अज्ञात हल्लेखोराणी सातेफळ फाट्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना आज सायंकाळी 9 च्या दरम्यान घडली सदर हल्ल्यात त्यांच्या हाताला जखम झाल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले. दरम्यान माने जवळून वार गेले आहेत

सविस्तर वृत्तानुसार आज दि 18 रोजी भाजप चे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण सौं अर्चना रोठे या मतदार संघात प्रचार करून परतत असतांना मतदार संघातील सातेफळ फाट्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अचानक हल्ला केला या हल्ल्यात अर्चना रोठे यांचा हाताला गंभीर घाव झाले हाताची नस कटली गेली हल्लेखोरांनी मानेवर वार केले मात्र त्यांनी हातावर हे वार घेतले यावेळी त्यांच्या गाडीवरही हल्ला करण्यात आला त्याची गाडी क्रमांक एम एच 27 डी बी 5001 या गाडीचे समोरील काच फोडण्याचाही प्रयत्न झाल्याचे समजते हल्ला करून हल्लेखोर अंधारात पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शनी यांनी सांगितले घटनेनंतर अर्चना रोठे यांना येथील डॉ सागर ढोले यांच्या दवाखान्यात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती पाठविण्यात आले, कार्यकर्त्यांनी तक्रार दाखल करण्याकरिता चांदुर पोलीस स्टेशन एकच गर्दी झाली होती. आपला प्रचार दौरा सोडून आमदार प्रताप अडसड हे अमरावती येथे रवाना झाले

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या