निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर?

मान्य झालेल्या मागण्यांचीच अंमलबजावणी सरकार करत नसल्याचा आरोप निवासी डॉक्टरांनी केला आहे. नाराजी डॉक्टरांनी आता पुन्हा संपाची हाक दिली आहे.

मुंबई | 20 February 2024 : राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना (MARD) आणि राज्य सरकारमधील शीतयुद्ध काही थांबायचे नाव घेताना दिसत नाही. यापूर्वी राज्य सरकारने डॉक्टरांची यशस्वी मनधरणी केली होती. 7 फेब्रुवारी रोजी मार्डने संपाची हाक दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली. यशस्वी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर जात आहे.
गुरुवारी संध्याकाळपासून संप

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे शासनाने त्यांच्या मागण्या मान्य करून त्याची अंमलबजावणी वेळेत न केल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) गुरुवारी संध्याकाळपासून संपावर जाणार असल्याचे परिपत्रक काढून जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती.मात्र, नियोजित संप सुरू करण्याच्या आधीच ७ फेब्रुवारी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात राज्यातील निवासी डॉक्टर संघटनेच्या (मार्ड) मागण्यांसंदर्भात बैठक झाली.विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याची ग्वाही देण्यात आली होती. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले होते.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या