सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे आगमन….
मंगरूळच्या मंगला माता मंदिरात सकाळी उपस्थिती….
धामणगाव रेल्वे येथे दुपारी प्रकट कार्यक्रम… धामणगाव रेल्वे,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघाचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ ला धामणगाव तालुक्यात आगमन होत असून सकाळी ९.५० वाजता मंगरूळच्या श्री मंगलामाता मंदिर येथे ते समापन सोहळ्याला उपस्थित राहतील तसेच दुपारी ४.३० वाजता मंगरूळ टी पॉइंट,अंजनसिंगी रोडवरील,अशोक विद्यालय समोरील पटांगणावर डॉ.भागवत यांचा प्रकट कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे मंगरूळ दत्त येथील श्री मंगला माता मंदिरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य श्री माधव सदाशिवराव गोवळकर गुरुजी यांचे १९४२ ला आगमन झाले होते या साक्षात्काराच्या ८१ व्या वर्ष पूर्ती निमित्य मंगरूळ येथे मंगला माता मंदिराद्वारे १०० साधकांच्या माध्यमाने श्री गुरुचरित्र पारायण सोहळा, घोरकष्टोद्धरण स्त्रोताचे एक हजार पाठ अनुष्ठान तसेच मंगरूळ येथील पुरोहितांद्वारे श्री दुर्गा सप्तशतीचे ११०० पाठ आणि ५००० भक्तांद्वारे घरोघरी श्री हनुमान चालीसा उपासना अभियान इत्यादी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या भव्य दिव्य अभियानाचा समापन सोहळा संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. मोहनजी भागवत यांच्या उपस्थितीत २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.५० वाजता सम्पन्न होणार आहे तसेच ही सुवर्णसंधी साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने धामणगाव रेल्वे व चांदुर रेल्वे तालुक्यातील सर्व गावातील गणवेषधारी स्वयंसेवकांचे एकत्रीकरण “नवोत्थान २०२४” या कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाकडे वाटचाल करीत असताना डॉ. भागवत यांचे अमूल्य मार्गदर्शन कार्य विस्तार व कार्य दृढीकरनाच्या दिशेने गतीने समोर जाण्यास संघाला उपयोगी ठरणार आहे परिसरातील नागरिक बंधू-भगिनींना डॉक्टर मोहनजी भागवत दुपारी ४.३० वाजता मंगरुळ टी पॉइंट वरील अंजनसिंगी रोडच्या, अशोक विद्यालयासमोरील पटांगणावर प्रकट कार्यक्रमांमध्ये उद्बोधन करणार आहेत बंधू-भगिनी नागरिकांनी प्रकट कार्यक्रमाकरिता दुपारी ४.३० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघचालक विपिन काकडे,धामणगाव रेल्वे तालुका संघचालक गजानन पवार व चांदुर रेल्वे तालुका संघचालक मनोज मिसाळ यांनी केले आहे