जंगलाजळ सापडली आई-वडिलांची बाईक, आणि….
पुण्यात गेल्या काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत ठरून जगत आहेत. त्याचदरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका इसमाने आधी पत्नीची हत्या करून नंतर गळफास लावून स्वत:चं आयुष्यही संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला
पुण्यात गेल्या काही महिन्यांत गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जीव मुठीत ठरून जगत आहेत. त्याचदरम्यान आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका इसमाने आधी पत्नीची हत्या करून नंतर गळफास लावून स्वत:चं आयुष्यही संपवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मात्र त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेल नाही. वडिलांच्या या कृत्यामुळे त्यांची मुलं मात्र पोरकी झाली असून आई-वडील दोघांचेही छत्र हरपल्याने त्यांचा दु:खाला पारावार उरलेला नाही.
शहरातील उत्तमनगर येथील एनडीएच्या पाठीमागील पिकॉक बे परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिस तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ सखाराम वाघ असं पतीचं नाव असून सुवर्णा वाघ असं त्याच्या मृत पत्नीचं नाव आहे. सोमनाथ याने आधी पत्नी सुवर्णाच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. त्यानंतर जंगलातील एका झाडाल गळपास लावून स्वत:ही जीव दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि सुवर्णा रविवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले पण ते रात्र उलटूनही बरत आले नाहीत.त्यामुळे त्यांच्या मुलीला चिंता वाटू लागली आणि त्यांनी तिच्या तुलतभावासह आई-वडिलांचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना उत्तमनगर मार्गाजवळ एका जंगलाजवळ आई-वडिलांची बाईक उभी दिसली. त्यांनी तिथे शोधाशोध केली असता जंगलात जमीनीवर आईचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदहे पडलेला दिसला. तर थोड्या अंतरावर वडिलांचा झाडावर गळफास घेतला देह दिसला. घाबरलेल्या त्या मुलांनी कसंबसं पोलिसांना कळवलं. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलिस स्टेशनमधील अधिकारी तेथे दाखल झाले आणि त्यांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेची माहिती पसरताच गावात एकच खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या