महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू
लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे.
मुंबई: लोकलने प्रवास करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अश्विनी डोमडे (वय २७) असे या मयत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी ही महिला लोकलने प्रवास करत असताना लोकलमधून पडली.
नाहूर रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन जखमी महिलेला मुलुंडच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तिच्या ओळखपत्रावर तिने अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतल्याचे समोर आले आहे. त्यानुसार कुर्ला लोहमार्ग पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.