नागपूर हादरलं
एकाच घरात आढळले 3 जणांचे मृतदेह, संशयास्पद मृत्यूमुळे खळबळ
एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.
नागपूर : राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. तर दुसरीकडे, नागपूरमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान गावात घरात 3 मृतदेह आढळले आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पती श्रीनिवास इळपुंगटी (वय 58 वर्षे),पत्नी पद्मालता इळपुंगटी (वय 54) आणि मुलगा वेंकट इळपुंगटी (वय 29) यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मृतांचा राईस मिलचा कौटुंबिक व्यवसाय आहे. घटनेची माहिती मिळताचपोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शव विच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली कुणी हत्या केली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.