काँगेस ला मोठा धक्का
पत्नीला लोकसभेचे तिकीट न मिळाल्याने ‘या’ आमदाराचा राजीनामा
आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोमवारी (२५ मार्च) सहावी यादी जाहीर केली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. अशातच आसाममध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील नोबोईचा या विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत नराह यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे
पत्नीला लोकसभा तिकीट न दिल्याने राजीनामा
आमदार भरत नराह यांनी त्यांच्या पत्नी राणी नराह यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना तिकीट मिळाले नाही. काँग्रेसने लखीमपूर लोकसभा मतदारसंघासाठी उदय शंकर हजारिका यांना उमेदवारी जाहीर केली. राणी नराह या लखीमपूरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. मात्र, तरीही राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे.