मोठी बातमी!
गोळीबाराच्या घटनेनं यवतमाळ हादरलं,
मध्यरात्री अंदाधुंद फायरिंग, 25 जणांविरोधात गुन्हा दाखल
यवतमाळ गोळीबाराच्या घटनेनं हादरलं असून, मध्यरात्रीच्या सुमारास अंदाधुंद फायरिंगची घटना घडली आहे.
यवतमाळच्या भोसा परिसरात वाळू घाटावर वाळू तस्करांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार पैनगंगा नदीपात्राच्या वाळू घाटावरील रस्त्याच्या वादातून एका गटानं दुसऱ्या गटावर फायरिंग केलीया घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, मात्र फायरिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.या गोळीबार प्रकरणात प्राप्त तक्रारीनुसार 25 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, चार जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून चार रिकामे काडतूस आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली, अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.