गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखली, दोघे ताब्यात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक रोखली, दोघे ताब्यात; १० लाखांचा मुद्देमाल जप्त
बांदा (सिंधुदुर्ग) : गोव्यातून मुबईच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करताना राज्य उत्पादन शुल्क इन्सुली विभागाने कारवाई केली. या कारवाईत १० लाख ८ हजारांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. गोवा बनावटीच्या दारू ५ लाख ४७ हजार २০০ रुपये व ४ लाख ५० हजाराचा मालवाहू टेम्पो व इतर मुद्देमाल १० हजार ८०० रुपये किंमतीचा जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी सकाळी बांदा ओटवणे रोडवर वाफोली येथे करण्यात आली.याप्रकरणी धोंडीराम लिंबाजी गायकवाड (वय-४२, मिरा रोड ईस्ट घोडबंदर ठाणे) व विशाल मारुती पठारे (४३, गोरेगाव,मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले.
याबाबत आधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वमीवर सर्व वाहनांची तपासणी करत आहेत. गोव्यातून येणाच्या मालवाहू टेम्पोची (एमएच ४७ वाय १९१७) तपासणीसाठी करण्यात आली. यावेळी कांद्याच्या गोणीखाली विदेशी मद्याचे ५० बॉक्स व ३० इतर मालाचे बॉक्स अवैद्यरित्या आढळून आले. या दारूची एकूण किंमत ५ लाख ४७ हजार २०० रुपये आहे. इतर मुद्देमाल १० हजार ८०० रुपये किंमतीसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो जप्त करण्यात आला.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रासकर, सहाय्यक दुव्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान दीपक शिंदे यांनी केली.अधिक तपास तानाजी पाटील करीत आहेत.