पुण्यात खळबळ
चौकीत पोलिसाने स्वतःवर गोळ्या झाडल्या
पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली.पुणे शहरात खळबळजनक घटना घडली आहे. पोलीस चौकीतच एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. भारत दत्ता आस्मर असे त्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पुण्यातील खडक पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीतील ही घटना घडली. शुक्रवारी पहाटे पोलीस कर्मचाऱ्याने गोळी झाडून आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद किंवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी जीवन संपवले, हे चौकशीतून स्पष्ट होणार आहे.पुणे येथील खडक पोलीस ठाण्यात भारत आस्मर हे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. गुरुवारी नेहमीप्रमाणे रात्रपाळीसाठी ते कामावर आले होते. त्यांची नेमणूक असलेल्या लोहिया नगर पोलीस चौकीत गेले. रात्री आपली बंदूक सोबत घेऊन वर असणाऱ्या खोलीत आरामासाठी गेले. परंतु अचानक काय झाले त्यांनी स्वत:वर एकापाठोपाठ चार गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.