वन्यप्राण्यांसाठी अशी ही सुविधा

जंगलात पाणीटंचाई, प्राण्यांसाठी १५ बोअरवेलचे काम सुरू
भारतातील सर्वात छोटा पण वनराई व प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध अश्या बोर अभयारण्यात सध्या पाण्याचे संकट गडद झाले आहे.

वर्धा : भारतातील सर्वात छोटा पण वनराई व प्राण्यांच्या वैविध्याने समृद्ध अश्या बोर अभयारण्यात सध्या पाण्याचे संकट गडद झाले आहे. सध्या आठ वन विभागात ९२ कृत्रिम, ५६ नैसर्गिक पाणवठे, २६ सोलर पंप असे एकूण १७३ पाण्याचे स्रोत आहेत. त्यात टँकर व बैल बंडीने पाणी पुरवठा सुरु आहे.

वर्धा, समुद्रपूर, हिंगणी, खरंगना, आर्वी, आष्टी, कारंजा, तळेगाव या क्षेत्रात टंचाई दूर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सहायक वन संरक्षक पवार सांगतात. तर बोर व्याघ्र प्रकल्पाचे वन अधिकारी मंगेश ठेंगडी म्हणाले की कोर क्षेत्रात ६९ कृत्रिम व २ नसर्गिक पाणवठे आहेत. मात्र पुरेसा पाणी पुरवठा व्हावा म्हणून १५ बोअर वेल मंजूर करीत त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मे अखेरीस ते कार्यरत होतील.बोरच्या बफ्फर क्षेत्रात नव्याने काही भाग जोडण्यात आला. ते क्षेत्र विस्तारले. त्याची जबाबदारी विशेष विभागावर टाकण्यात आले आहे. चारा हा प्रश्न आहेच.मात्र त्यासाठी वर्धा वन विभागाने दोन विस्तीर्ण कुरण क्षेत्र तयार केले आहे. या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या समुद्रपूर तालुक्यातील खुरसापार तसेच आर्वी येथे असलेल्या कुरण लागवडीने चारा टंचाई नसल्याचा दावा पवार करतात. हरीण, कळविट येथे चरत असतात. वन्य प्राणी चारा तसेच पाण्यासाठी गावाकडे येतात. तसे होवू नये म्हणून सर्व ते उपाय केले जात आहेत.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या