सर्वात मोठी बातमी!
नाना पटोलेंचा भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत गाडीचा चुराडा
मोठी बातमी समोर येत आहे. नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. गाडीला ट्रकने धडक दिली.
भंडाऱ्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. प्रचार करून परतत असताना ट्रकने मागून धडक दिली. या अपघातामध्ये नाना पटोले हे थोडक्यात बचावले आहेत. भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचं मोठं नुकसान झालं असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत.
नान पटोले हे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत पडोळे यांचा प्रचार दौरा आटपून रात्रीच्या सुमारास परतत असताना भिलेवाडा गावाजवळ त्यांच्या ताफ्याला भरधाव आणि अनियंत्रित झालेल्या ट्रकनं जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, नाना पटोले हे ज्या गाडीत बसले होते, त्या गाडीच्या मागच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. मात्र सुदैवानं या अपघातामध्ये नाना पटोले आणि गाडीतील इतर कोणालाही कोणतीही दुखापत झालेली नाही. सर्व जण सुरक्षीत आहेत.