सर्वात मोठी बातमी
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस हे आज माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना महत्त्वाचं वक्तव्य केलं.महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणती घडामोड घडेल? याचा भरोसा नाही. देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडताना दिसत आहे. महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. या घडामोडींमुळे माढा लोकसभा मतदारसंघ सातत्याने चर्चेत येतोय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज माढ्यात सभा पार पडली. यावेळी त्यांनी माढ्यातील राजकीय घडामोडींबाबत अतिशय सूचक असं वक्तव्य केलं. त्यामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडणं बाकी आहेत, असे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूंकप येण्याची शक्यता आहे. कारण माढ्यात निंबाळकर घराणं येत्या काळात एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी सूचक वक्तव्य केलं. “मोदी है तो मुमकिन है. आमचा प्रयत्न सर्वांना एकत्रित करण्याचा असतो, विभाजन करण्याचा नसतो. आता काय-काय होतं हे पुढे पाहा”, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.