यवतमाळच्या बुकींना पन्नासे ले आऊटमधून रंगेहाथ अटक

सोनेगावच्या पन्नासे ले-आऊटमध्ये चालणाऱ्या यवतमाळच्या क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर छापा टाकून गुन्हे शाखेने तीन बुकींना अटक केली आहे. दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या अड्ड्यावरून कार, लॅपटॉप, मोबाइलसह ३५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पन्नासे ले आऊट येथील पर्ण अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०१ मध्ये सट्टेबाजीचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास धाड टाकली असता तेथे हरिओम उमेश बत्रा (३१,केळापूर, यवतमाळ), रवी नंदकिशोर बोरेले (३८, पांढरकवडा, यवतमाळ) आणि अयफाज शेख कादीर (२३ पांढरकवडा, यवतमाळ) हे आढळले. रॉयल चॅलेंजर बंगळुरू व सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान सुरू असलेल्या सामन्यावर ते लगवाडी-खायवाडी करत होते. त्यांच्या ताब्यातून एलसीडी टीव्ही, रेकॉर्डर, लॅपटॉप, २३ मोबाईल फोन, दोन कार व एक दुचाकी असा ३५.६१ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तीनही आरोपींविरोधात सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या