सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने आत्महत्या केलीय. मुंबई पोलीस आयुक्ताच्या कार्यालयमधील लॉकअपमध्येच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या एका आरोपीने आत्महत्या केली. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातील लॉकअपमध्येच या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. अनुप थापन, असं या आरोपीचं नाव असून त्याला जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. उपचार सुरू असताना आरोपीचा मृत्यू झालाय.
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर बिश्नोई गँगने गोळीबार केला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. सलमान खानच्या वांद्र्यमधील गॅलेक्सी अपार्टममेंटवर बिश्नोई गँगच्या हल्लेखोरांनी गोळीबार केला होता