भाजप खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार
लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास अवघे 3 दिवस शिल्लक असताना आता बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.लोकसभा निवडणुकीसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं आहे. जवळपास 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा एनडीएचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलची आकडेवारी खरी नाही. हा फक्त अंदाज आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास 3 दिवस बाकी असताना बिहारमध्ये हिंसाचाराची घटना समोर आली आहे. बिहारमध्ये भाजप खासदाराच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारातून भाजप खासदार सुखरुप बचावल्याची माहिती समोर येत आहे.