*श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत “कार्तिक मास मांड (अखंड-भजन) शुभारंभ” आणि”अमावस्या” निमित्त “चंदनउटी व प्रवचन कार्यक्रम”*

 

अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे दिनांक २/१०/२०२४ बुधवारला सकाळी ५.०० वाजता कार्तिक मास मांडीची सुरुवात लहान मंदिरात ढाल बसवून मुख्य मंदिरात महाराजांच्या अरजेने विश्वस्त मंडळाचे उपस्थितीत करण्यात येणार आहे आणि दुपारी ४.०० वाजता संस्थानच्या वतीने “अमावास्या” निमित्त “चंदन – ऊटीचा” कार्यक्रम आणि रात्री ८ ते १० वाजता अवधूत नाम प्रबोधनकार रेखाताई सुरकार, तळेगाव (टालाटुली) जि.वर्धा यांचा महाराजांचे ओवीवर प्रवचन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाकरिता अन्नदान दाते शीला गजानन कांबळे, कवाडी जि.वर्धा व किसना प्रल्हाद हिवाळे,हरसुल जि. यवतमाळ यांचे सहभागातून आणि संस्थानचे अन्नदान समितीच्या नियंत्रणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
*कार्तिक मास मांडीमध्ये बाहेरगावातील अवधूत भजन मंडळांचा दैनंदिन सहभाग राहणार आहे. त्याकरिता संस्थानच्या वतीने दि. २/१०/२०२४ ते दि.१५/११/२०२४ या कालावधीचे भजन पाळीचे नियोजन तयार करण्यात आले आहेत.या सहभागी अवधूत भजन मंडळांकरिता संस्थानच्या वतीने चहा, नाश्ता आणि भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच श्रीफळ देऊन मंडळांचा सत्कार आणि नवीन सहभागी मंडळांना महाराजांची गाथा भेट म्हणून देण्यात येणार आहे.


*बाहेर गावावरून येणारे भाविकांकरिता संस्थानचे अन्नदान समितीच्या वतीने दैनंदिन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संस्थानचे प्रसादालयामध्ये प्रसाद देणगी पावती घेऊन भाविकांना प्रसादाचा लाभ घ्यावा.
*संस्थानचे गौरक्षणमध्ये भाविकांनी दान दिलेल्या गायी आहेत, त्यांची देखभाल संस्थान करीत आहेत . त्या गायीकरिता चाऱ्याची नितांत आवश्यकता आहे. जे इच्छुक दाते असतील, त्यांनी गौरक्षण मधील गायीकरिता चारा पाठवण्याची व्यवस्था करावी, असे संस्थानच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
*तरी सर्व भाविक- भक्तांनी तन-मन-धनाने सहकार्य करून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, अशी विनंती संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे उपाध्यक्ष कृपासागर राऊत सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, दिगांबर राठोड, अनिल बेलसरे, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या