नागपूर हादरलं!
सेवानिवृत्ती शिक्षकासह अख्ख्या कुटुंबानं संपवलं आयुष्य; घरात आढळले मृतदेह
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.
नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. एकाच घरात चार मृतदेह दिसून आल्यानं गावात खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पती पत्नी आणि दोन मुलांचा यामध्ये समावेश आहे.