पुणे जिल्ह्यात कोरोनाचा मोठा शिरकाव; कोरोनाग्रस्त तालुके पुढीलप्रमाणे!

पुणे | पुणे जिल्ह्यातील शिरूर, वेल्हे, मुळशी, इंदापूर या तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आजही या तालुक्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर काही रुग्णांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे भिगवणमधील 38 जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त तालुके खालील प्रमाणे:  

शिरूर : शिरूर शहर व तालुक्यात कोरोनाची व्याप्ती वाढत चालली असून, आज शहरात दहा, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात १२ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले. त्यातच शहरातील ६२ वर्षीय बाधित व्यक्तीचा आणि नागरगाव येथील बाधित सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याने तालुका हादरून गेला आहे.

भिगवण : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका कोरोनाबाधित व्यवसायिकाच्या संपर्कातील तीन व्यावसायिकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांवरील कोरोनाचे संकट गडद झाले होते. परंतु, सबंधित तीन रुग्णांसह संपर्कातील 35 व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भिगवणकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आणखी एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कोरोनाची साखळी मात्र सुरुच राहिली आहे. भिगवण येथील एका व्यावसायिकास रविवारी (ता. 19) कोरोनाची बाधा झाली होती कोरोनाबाधित व्यावसायिक एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील व्यावसायिकांच्या संपर्कात आला होता. संपर्कातील नऊ व्यावसायिकांनी तपासणी केली असता 3 व्यक्तींची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे भिगवणकरांवर कोरोना संकट गडद झाले होते.

वेल्हे : वेल्हे तालुक्यात आज सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये वांगणीवाडी येथील २, ओसाडे येथील २, तर निगडे मोसे, कुरण बुद्रुक, पानशेत येथील प्रत्येकी १, असे मिळून सात जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ९५ वर पोहचली असून, ४२ जणांनी कोरोनावर मात केली असून, दोन जेष्ठांचा मृत्यू झाला आहे, तर ५१ जणांवर उपचार चालू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

पिरंगुट : मुळशी तालुक्‍यात कोरोनाचे 31 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या आता 460 झाली आहे. तालुक्‍यात पिरंगुट येथे 4, म्हाळुंगे, सूस, भूगाव व जांबे येथे प्रत्येकी 1, लवळे येथे 3, बावधन, कासार आंबोली व माण येथे प्रत्येकी 2, दारवली येथे 8, तर बोतरवाडी 6 रुग्ण सापडले. बरे होऊन घरी गेलेल्यांमध्ये 23 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्‍यात बरे होऊन घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या 194 झाली आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या