प्लाझ्मादान करा हीच सध्यातरी कोरोनवरील लस; शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कडून युवकांना आव्हान!

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आव्हानानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताचा तुटवडा भरून काढण्यात आला होता, यामध्ये भगवानराव भरने प्रतिष्ठान, प्रविण भैय्या माने युवा मंच, लोकसेवक गणपतराव आवटे फौंडेशन, भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब या सर्वांनी मिळून ट्रस्ट ला सहकार्य करत इंदापुर तालुका व संबंध महाराष्ट्रामध्ये रक्तदानाचा इतिहास रचला होता, त्यामुळे आता पुन्हा महाराष्ट्राला रक्तदान आणि प्लाझ्मा दानाची गरज आहे आणि ती आपण सर्वांनी मिळून भरून काढुयात असे आव्हान शिवशंभू ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांनी केले आहे.

★काय आहे प्लाझ्मा थेरपी!
प्लाझ्मा थेरपी विषाणूवर मात करून रुग्णांमधील प्रतिकारक्षमता वाढविण्याचे काम करत आहे. ही पूर्ण प्रक्रिया रक्तातून पार पडत आहे. एखाद्याला जीवनदान देणाऱ्या या वैद्यकीय प्रक्रियेदरम्यान रक्तातील अनेक घटकांचे विलगीकरण होते. याविषयी रक्तदात्यांना कुतुहल आहे. विषाणू व जिवाणूजन्य आजारावर मात केलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून विषाणूशी लढा देते. त्यातून विषाणूला मारण्यासाठी प्रतिपिंड तयार होऊन ते परिणामकारक औषध ठरत आहे. परिणामी, दुसऱ्या व्यक्तीसाठी प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. प्लाझ्मा हा अफेरेसिस स्वयंचलित मशीनच्या (चिकित्सा प्रक्रिया) माध्यमातून जमा केला जातो. ही अत्यंत सुरक्षित प्रक्रिया आहे. 30 मिनिटांच्या प्रक्रियेत रक्तांच्या तपासण्या करूनच प्लाझ्मा दान केले जाते.

प्रथम पाच मिली रक्त काढून व्यक्ती प्लाझ्मासाठी पात्र आहे का, याची तपासणी केली जाते. त्यानंतर रक्तगट जुळवणी केली जाते. रक्तातून संक्रमित होणारे आजारांच्या (कावीळ, एचआयव्ही, मलेरिया, गुप्तरोग) तपासण्या केल्या जातात. रक्तात काही दोष आढळल्यास प्रक्रिया थांबते. तपासणीनंतरसर्व काही ठीक असेल तर पुढे रक्तवाहिन्यातील रक्तपेशी व रक्तजल वेगळे करून पांढऱ्या व लाल रक्तपेशी, रक्तबिंबीका (प्लेटलेट्‌स), क्रायोप्रेसिपिटेट पुन्हा दात्याच्या शरीरात सोडले जातात. प्लाझ्मा जमा केल्यानंतर तो सुरुवातीला चार तास 80 डिग्री सेल्सिअस थंड तापमानाला व 40 डिग्री सेल्सिअसला एक वर्षापर्यंत साठवून ठेवता येणे शक्‍य आहे. कोरोनाबाधित बरे होऊन गेलेली प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याला जीवनदान देऊ शकते. एक व्यक्ती प्लाझ्मा दान करताना 400 ते 500 एमएल प्लाझ्मा दान करू शकते. पहिले 28 दिवस पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांतून एकदा पुन्हा प्लाझ्मा देऊ शकतो. व्यक्तीचे वजन कमीत कमी 55 असायला हवे. हिमोग्लोबिन 12.5 च्या पुढे असणे गरजेचे आहे. दात्याने दोन तासांपूर्वी धुम्रपान करता कामा नये. 12 तास अगोदर अल्कोहोल घेता कामा नये. प्लाझ्मादानानंतर शरीरातील कोणतीही प्रतिजैविके कमी होत नाहीत. ती पुन्हा तयार होत आहेत.
अश्या प्रकारे प्लाझ्मादानाचे खूप उपयोग आहेत म्हणूनच सर्वच सामाजिक संस्थांनी तरुण युवकांना प्लाझ्मादानासाठी पुढे येण्याचे आव्हान केले आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या