शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?
सप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला अशोक चव्हाण यांचं आश्चर्य वाटतं. कारण गेल्या आठवड्यात देशाच्या संसदेत…!
सुप्रिया सुळेंचं राहुल नार्वेकरांच्या निकालाबाबत स्पष्टीकरण!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाची एकीकडे प्रतीक्षा असताना दुसरीकडे शरद पवार गट थेट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भातलं वृत्त शरद पवार गटाकडून फेटाळण्यात आलं असलं, तरी राहुल नार्वेकरांच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही या चर्चेवर पडदा पडलेला नाही. त्यासंदर्भात आज शरद पवार गटाच्या लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. तसेच, अपात्रता प्रकरणावरही भाष्य केलं.
“…तर आम्ही कोर्टात जाऊ”
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येण्याआधीच सुप्रिया सुळेंनी पक्षाची पुढची दिशा स्पष्ट केली आहे. “जर शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरले, तर आम्ही कोर्टात जाऊ. त्यात समस्या काय आहे?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.