चांदुर रेल्वे मधील उद्या होणारे रेल रोको आंदोलन स्थगित

 

चांदुर रेल्वे रेल रोको कृती समितीच्या प्रयत्नांना यश.

अश्विनीजी कुमार रेल्वेमंत्री भारत सरकार यांचे मानले आभार

*चांदुर रेल्वे:-उद्या चांदुर रेल्वे येथे होणारे रेल रोको आंदोलन खासदार रामदासजी तडस व आमदार प्रतापदादा अडसड यांच्या प्रयत्नातून मागे घेण्यात आले.
चांदुर रेल्वे येथील नागरिकांनी फटाक्याच्या आतिषबाजी सह मिठाई वाटून केला हा आनंदोत्सव साजरा केला.
हा राजकीय विषय नसून चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामस्थांच्या जिव्हाळ्याचा विषय होता आणि त्याच अनुषंगाने आपण सातत्याने पाठपुरावा करून आपले खासदार रामदासजी तडस यांच्या माध्यमातून आजचा थांबा पूर्ववत करण्यात यशस्वी झालो असे मत आमदार प्रतापदादा अडसड यांनी यावेळी वैक्त केले आहे.
चांदुर रेल्वे तालुक्यातील चांदूर रेल्वे रेल रोको कृती समितीच्या माध्यमातून जबलपूर एक्सप्रेस व शालिमार एक्सप्रेस चा थांबा पूर्ववत करण्यासंदर्भात उद्याला रेल रोको आंदोलन करण्यात येणार होते. या संदर्भात खासदार श्री.रामदासजी तडस व आमदार श्री.प्रतापदादा अडसड यांचे प्रतिनिधी धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणुक प्रमुख श्री.रावसाहेबजी रोठे, वर्धा जिल्हा भाजपा सचिव प्रणयजी जोशी यांनी कृती समितीची शासकीय विश्रामगृह येथे चर्चात्मक बैठक घेतली असता यातून तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा झाली व या चर्चेतून खासदार रामदासजी तडस व आमदार प्रताप दादा अडसड यांच्या प्रयत्नातून माननीय रेल्वेमंत्री अश्विनी जी कुमार यांनी चांदूर रेल्वे येथे जबलपूर एक्सप्रेस चा रेल्वे थांबा मंजूर केला व शालीमार एक्सप्रेस चा रेल्वे थांबा लवकरच पूर्ववत करण्यासंदर्भात आश्वासित केले. यावेळी चांदुर रेल्वे रेल रोको कृती समितीचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते व चांदुर रेल्वे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा उपस्थित होते.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या