अबब…. लोणार सरोवर परिसरातील बिबट झाला सोनेरी…!

उल्कापातामुळे झालेली निर्मिती म्हणजे राज्यातील बुलढाणा जिल्हयातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर.

नागपूर : उल्कापातामुळे झालेली निर्मिती म्हणजे राज्यातील बुलढाणा जिल्हयातील खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर. बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे. अशा या सरोवरात गेल्या काही दिवसांपासून बिबट सातत्याने दर्शन देत आहे. सुर्याची कोवळी किरणे अंगावर पडून सोनेरी भासणारा बिबट ‘मी लोणारकर’ चमूतील सचिन कापूरे यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात टिपला. सोबतीला याच चमूचे सदस्य संतोष जाधव देखील होते.

लोणार सरोवर परिसरात सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत. सरोवराची निर्मिती ५० हजार वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. मात्र, एका शोधनिबंधात ते त्याहीपेक्षा अधिक वर्ष जुने असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या सरोवराची निर्मिती नेमकी किती वर्षांपूर्वी हे कुणीही सांगू शकत नाही. या सराेवराच्या निर्मितीपासून अनेक संशोधन संस्था, संशोधक याठिकाणी संशोधन करायला येतात. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. १८२३ मध्ये जे.ई. अलेक्झांडर हे ब्रिटिश अधिकारी, तलावाला भेट देणारे पहिले युरोपियन होते. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हा हा तलाव आहे. हा एकेकाळी मौर्य साम्राज्याचा आणि नंतर सातवाहना साम्राज्याचा भाग होता.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या