राजधानी नवी दिल्लीत मुंडे भगिनी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक, पडद्यामागे काय घडतंय

अबब….

भाजपचे दिल्लीमध्ये दोन दिवस राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. राज्यातील भाजपचे दिग्गज नेते राजधानी नवी दिल्लीत उपस्थित आहेत. अशातच एक आतली बातमी समोर आली आहे. मुंडे भगिनी आणि फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे.
नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार (आज) आणि रविवारी नवी दिल्लीमध्ये सूरू आहे. या अधिवेशनाला देशभरातून कार्यकर्ते उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेते दिल्लीमध्ये आहेत. अशातच एक मोठी बातमी समोर आली असून भाजप नेत्या खासदार पंकजा मुंडे आणि खासदार पंकजा मुंडे आणि भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत
खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वीस मिनिटे बैठक झाली. बैठकीचे कारण अस्पष्ट आहे, केंद्रीय मंत्री रावसाहेव दानवे यांच्या बंगल्यामध्ये ही बैठक झाली. बैठकीनंतर प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्री भारती पवार रावसाहेब दानवे भागवत कराड गिरीश महाजन पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.

राजकारणात माझ्यासोबत दगाफटका, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झाल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी सध्या ‘गाव चलो अभियान’ मध्ये केलं होतं. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या