……आणि महिलेने सर्वस्वी गमावले ?
राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; अमरावतीच्या महिलेने राजकीय लालसेत सर्वस्व गमावले अशी माहिती प्राप्त झाली आहे.
बुलढाणा:-फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस पक्षाचे पद देण्याचे आमिष दाखवून आरोपीने महिलेला जाळ्यात ओढले.
आरोपीने शितपेयात गुंगीचे औषध देवुन महिलेचे बळजबरीने शारीरीक अत्याचार केले. तसेच तिचे आपत्तीजनक फोटो काढले.
राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून शेगावमधील एका कथित पुढाऱ्याने अमरावती येथील महिलेच्या अब्रूचे धिंडवडे उडविले. फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस पक्षाचे पद देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला जाळ्यात ओढले. दोन मुलांची आई असलेल्या महिलेसोबत जवळीक वाढविली. दरम्यान आई आजारी असल्याचा बहाणा करून तिला शेगांव येथील घरी बोलाविले. शितपेयात गुंगीचे औषध देवुन बळजबरीने शारीरीक अत्याचार केले. तसेच तिचे आपत्तीजनक फोटो काढले.