दुर्दैवी! मुदत संपण्यापूर्वीच सेंट्रिंग काढल्याने स्लॅब कोसळले दोन मजूर मृत्यूमुखी
- दुर्दैवी!
मृत्यू कसा केव्हा येईल हे सांगता येत नाही असे म्हणतात. या घटनेत तसेच झाले. मात्र घाई भोवल्याने दुर्दैवी घटना घडली.
वर्धा : मृत्यू कसा केव्हा येईल हे सांगता येत नाही असे म्हणतात. या घटनेत तसेच झाले. मात्र घाई भोवल्याने दुर्घटना घडली. आर्वी तालुक्यातील वाढोणा गावात दोघांचा बळी गेला. गावातील स्मशानभूमी जवळ असलेल्या नाल्यावर नागरिकांची पूल बांधून देण्याची मागणी होती. कंत्राटदार प्रफुल्ल रामटेके यांनी मजुरांना त्या कामाची जबाबदारी दिली. त्याप्रमाणे सात दिवसापूवी स्लॅब टाकण्यात आला.
स्लॅबचे लाकडी सेंट्रिंग ठरल्यानुसार २१ दिवस ठेवणे अपेक्षित होते. मात्र या कामावरील मजुरांना छ्तीसगड येथे गावी जाण्याची घाई लागली. त्यामुळे त्यांनी मुदतीपूर्वीच घाई करीत सेंट्रिंग काढणे सूरू केले. ते काढत असतांनाच स्लॅब कोसळला. त्यात अशोक वरकडे व नवल टेकाम हे मलब्याखाली दबले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अरविंद कतलाम हे घटनास्थळी पोहचले. मजुरांना बाहेर काढण्यात आले. मात्र त्यात या दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलीस चमू करीत आहे.