लोकसभेसाठी भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीची तारीख ठरली, महाराष्ट्रातून कुणाचं नाव?
भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या यादीत देशभरातील १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने गेल्या काही महिन्यांपासून सर्व ताकद पणाला लावत तयारी सुरू केली आहे. अशातच आपल्या उमेदवारांना प्रचारासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी भाजपकडून लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याआधीच आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. २९ फेब्रुवारी रोजी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर लगेचच म्हणजे २९ फेब्रुवारी रोजी रात्री किंवा १ मार्च रोजी पक्षाकडून पहिल्या यादीत देशभरातील १०० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्या भाजप उमेदवारांचे नाव पहिल्या यादीत येते, याबाबतही उत्सुकताना निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट असणाऱ्या नेत्यांना उमेदवारांच्या पहिल्या यादीत स्थान मिळवण्याची शक्यता आहे. मात्र ज्या जागी विद्यमान खासदारांना डच्चू देत नवीन उमेदवाराला संधी द्यायची आहे, अशा ठिकाणी भाजपकडून सर्वांत शेवटी उमदेवारी जाहीर केली जाईल, असेही समजते.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात असणारे नारायण राणे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे यांचा समावेश भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत असू शकतो.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या