धामणगाव रेल्वे श्री गजानन माऊली संस्थान काशीखेड येथे श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कळसरोहण सोहळा
बुधवार दिनांक २७ फेब्रुवारी चे ३ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे या अध्यात्मिक सोहळ्यानिमित्त मंगळवार २७ फेब्रुवारीला श्रींच्या मूर्तीची व कळसाची ग्राम परिक्रमा आयोजित करण्यात आली दिनांक २८ फेब्रुवारीला श्रींच्या पूजेस प्रारंभ होणार असून प्रधान संकल्प, श्री गणेश पूजन, पुण्याहवाचन, सर्व पीठ स्थापना, जलाधिवास, धान्याधिवास,वस्त्राधिवास, अण्णाधिवास, हवन द्रव्याधिवास, फलाधिव्यास,शय्याधिवास नैवेद्य आरती होणार आहे तसेच गुरुवार २९ फेब्रुवारीला सकाळी ७ वाजता मंदिर स्वप्न, मंदिर पूजन, मूर्ती स्वप्न,कळस स्थापना, बलिदान, पूर्णाहुती नैवेद्य, आरती १ मार्चला सकाळी ६ वाजता काकडा व श्रींची आरती सकाळी नऊ वाजता श्रींच्या सामूहिक पारायण सुरुवात,सायंकाळी ६ वाजता हरिपाठ ७ वाजता श्रींची आरती तसेच रात्री ८ वाजता गुरुदेव भजन मंडळ काशीखेड च्या वतीने भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शनिवार २ मार्चला सकाळी ६ वाजता काकडा व श्रींची आरती सकाळी ९ वाजता श्रींच्या सामुहिक पारायणास सुरुवात सायंकाळी ६ वाजता हरिपाठ ७ वाजता श्रींची आरती व रात्री ८ वाजता राधाकृष्ण भजन मंडळ, जळगाव जगताप च्या वतीने भजन होणार आहे रविवार ३ मार्च २०२४ ला सकाळी ६ वाजता काकडा व श्रींची आरती ७ वाजता श्रींच्या पारायणाची समाप्ती व सकाळी ९ ते ११ पर्यंत ह.भ.प. श्री महेश सोनटक्के महाराज आळंदी, नागपूर यांचा काल्याचा किर्तन आयोजित करण्यात आला आहे सकाळी ११ वाजता छप्पनभोग नैवेद्य व श्रींची महाआरती तसेच दुपारी १ ते ५ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून श्री च्या मूर्तीच्या स्थापना पासून तर आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये माऊली भक्तांनी उपस्थित राहण्याची आवाहन श्री गजानन माऊली संस्थान काशीखेड व समस्त ग्रामवासी यांनी केले आहे