हरताळा गावातली जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम गुणवत्ताशून्य
नितीन कदम यांनी निकृष्ट गुणवत्तेबाबत कारभार आणला चव्हाट्यावर
ग्रामस्थांचे नितीन कदम यांच्या नेतृत्वात आंदोलनाची तयारी
प्रतिनीधी/अमरावती
भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागातील हरताळा येथील नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने पिण्याच्या पाण्याच्या टाकीच्या बांधकामाबाबत हरताळा ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर बाब ग्रामस्थांनी नितीन कदम यांच्याशी भ्रमणध्वनी व्दारे कळविल्यावर नितीन कदम यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट हरताळा गाठले.निरीक्षण केल्यानंतर मोठा गैरप्रकार असल्याचा त्यांच्या निदर्शनास आले.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम थांबवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
*हरताळा ग्रामपंचायत हद्दीमध्ये झपाट्याने वाढत आसलेल्या रुंदीकरणाने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. या कामाच्या कंत्राटदाराकडून पाण्याच्या टाकीसाठी सिमेंट, खडी, रेतीचा वापर अतिशय कमी प्रमाणात करून त्याजागी मुरुम व दगड वापरले जात आहेत.*
*पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून याबाबत हरताळा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशीची मागणी केली आहे.* *शासनाद्वारे जल जिवन मिशन अंतर्गत पाण्याच्या व्यवस्थेचं नियोजन व त्यावर अंमबजावणी करून पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन भरमसाठ खर्च व निधी व्यवस्थेमार्फत कंत्रादारांला दिल्या जातो. परंतु गुणवत्ताशून्य बांधकाम ग्रामस्थांच्या नशिबी येते. व बांधकामाच्या काहीं वर्षानंतर पुन्हा भीषण पाणीटंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागते.*
*सदर कामाचा निधी व्यर्थ जाण्याच्या मार्गावर आहे. या योजनेतून सुरू असलेले कामे नवख्या कंत्राटदारासारखे करत असून ज्या जिल्हा परिषद पाणीपुरवठा उपविभागामार्फत कंत्राट दिले जाते त्याची माहिती गावातील नागरीकांना, सामाजीक कार्यकर्त्यांना सूध्दा राहत नाही. हे कंत्राटदार शासनाने दिलेल्या अटीनुसार व शर्तीनुसार बांधकाम करीत नसून टाकीचे फाउंडेशन जालीचा लोहा बांधणी ही शेड्युल बी (इस्टीमेट) नुसार करीत नसल्याचे दिसून येत आहे तर अनेक बांधकामावर माती मिश्रीत रेती, सिमेंट हे अतिशय निकृष्ट दर्जाचे वापरण्यात येत असल्यामुळे जल जीवन मिशन योजनेतील नवीन पाण्याचा टाकीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केल्या जात आहे या बांधकामावर कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने या कंत्राकदाराची मनमानी सुरू आहे. त्यामुळे या योजनेतील निधीचा बोजवारा उडाला अशी ग्रामस्थांची समज आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे कामे करणारे अधिकारी कंत्राटदार अभियंते यांच्या कामाची सखोल चौकशी करून शासनाच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.*
*यावेळी नितीन कदम यांच्यासह पंकज देशमुख,अभिषेक सवाई,मुकुंद बांबल,सतीश सनके, ठाकुर काका, अजय वानखडे, श्रीधर चव्हाण, रामदास निंबाळकर, श्रीकृष्ण कुर्हेकर, लक्ष्मण कुऱ्हेकर, चंदू गाडे, प्रभाकर चव्हाण, महेंद्र पारडे, गोविंद चव्हाण, संतोष माकोडे, नंदू माकोडे, आशिष चव्हाण, छोटू कोरडे, दामोधर काकडकर, अर्जुन लोणारे, गजानन कुऱ्हेकर, अक्षय देशमुख, अनंत पवार व ईतर ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.*
ग्रामस्थांनी सदर प्रकार माझ्या लक्षात आणून दिला. मी कुठलाच विचार न करता हरताळा भागात पोहचून या बांधकामाचे निरीक्षण केले. वस्तूपरिस्थिती लक्षात आल्यावर संबधीत गैरप्रकार आमच्या निदर्शनास आला. या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे काम व्यवस्थित जनसामान्यांच्या सोईयुक्त नसेल होत तर ग्रामस्थांसह संबधीत कार्यालयासमोर निदर्शने करण्याची आमची तयारी आहे.
नितीन कदम,अध्यक्ष संकल्प बहुउदेशीय संस्था