अजिदादांच्या शिलेदारानं केला करेक्ट कार्यक्रम;

राष्ट्रवादीमध्ये मोठी इनकमिंग,

शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईला रवाना
अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
लोकसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, सर्वच पक्षांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी बीडच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे आज बीडमधील आजी, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे.शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेकडो गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.
आजच्या या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे बीडमधील क्षीरसागर कुटुंबातील राजकारणाला मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे युवा नेते डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना बायपास करून हा प्रवेश सोहळा होत असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. यामुळे बीडमध्ये निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर आली आहे.
दरम्यान दुसरीकडे या पक्षप्रवेशावर राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्या कार्यकर्त्यांनी आधीच तीनदा पक्षप्रवेश केला आहे, ते पुन्हा एका पक्ष बदलत आहेत एवढंच, ते फक्त बातमीसाठी पक्ष बदलत आहेत. यामुळे संदीप क्षीरसागर यांना कोणताही फरक पडणार नसल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या