भाजप आमदाराच्या पुतण्यावर बेछूट गोळीबार

जागीच मृत्यू

महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला.
पाटना : भाजप आमदाराच्या पुतण्याची भरदिवसा गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी बिहारमध्ये कटिहार जिल्ह्यात भाजप आमदार कविता पासवान यांच्या पुतण्यावर गोळीबार केला. यामध्ये कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवान याचा जागीच मृत्यू झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बिहारच्या कोढा विधानसभा मतदारसंघाच्या महिला आमदार कविता पासवान यांचा पुतण्या नीरज पासवानवर गोळीबार झाला. कटिहार शहरातील नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. हत्या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

नीरज पासवान हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. माजी महापौर शिवराज पासवान हत्याकांड प्रकरणी तो आरोपी होता आणि नुकताच तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. दरम्यान, भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या