नितीन कदम यांची शिवभक्ती!

* बडनेरा येथील प्राचीन कोंडेश्वर मंदिरासह विविध शिवसंस्थानात भाविकांची गर्दी*

* नितीन कदम यांनी स्वीकारला महाआरतीचा बहुमान*

*‘हर हर महादेव’… ‘ओम नम: शिवाय’च्या गजरात बडनेरा शहर व ग्रामीण भागात ठिकठिकाणी महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शंभो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी बडनेरा मधील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप आले होते. काही ठिकाणी भजन, कीर्तनासह विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध शिवमंदिर संस्थानासह पौराणिक ऐतिहासिक परंपरा अविरत जोपासत आलेले ‘श्री क्षेत्र कोंडेश्र्वर मंदिर संस्थानात नितीन कदम यांनी महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महाआरतीचा बहुमान स्वीकारला.*
*बडनेरा येथील उंच डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या श्री क्षेत्र कोंडेश्र्वर येथे पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी पोहोचले होते. सदर बडनेरा शहर व ग्रामीण भागातील श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर, शिव मंदिर बेलपुरा, शिवमंदिर पार्वती नगर, नेहरू मैदान, शिव मंदिर गडगडेश्र्वर येथील शिव पार्वती विवाह, , कल्याण नगर येथिल शिवमंदिर, पाताळेश्र्वर मंदिर भुतेश्र्वर चौक, आसरा माता मंदिर यशोदा नगर, वडरपुरा शिवमंदिर , कंपसापुरा – सावता मैदान शिवमंदिर, आनंदेश्र्वर महादेव मंदिर अंबागेट, येथे आयोजित महाशिवरात्री कार्यक्रमानिमित्त नितीन कदम यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली. दरम्यान यानिमित्त ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये नितीन कदम यांच्या संस्थेने फराळाचे पदार्थ वितरित केले. सर्वच मंदिरांत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन,अभिषेक, पालखी सोहळा, प्रवचन असे कार्यक्रम झाले. मंदिर परिसरात यात्रा भरल्या होत्या. पूजा विधी, अभिषेक करण्यासाठी पहाटेपासून शिवभक्तांनी रांगा लावल्या होत्या.त्याचप्रमाणे महाशिवरात्री उत्सव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भूतेश्र्वर चौक व गडगडेश्र्वर मंदिर संस्थान येथील मंदिरात सकाळी शंकराच्या पिंडीवर अभिषेक करण्यात आला. दिवसभरात हजारो शिवभक्तांनी महादेवाचे दर्शन घेतले. शिवमंदिरात अभिषेक, दिंडी, पूजा-पाठ, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजिले होते. यावेळी नितीन कदम यांच्यासमवेत सौ. निशा कदम, पर्वेश कदम,अभिषेक सवाई सोबतच संकल्प शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या