तिथे अवतरली गंगा
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात अवतरली गंगा, कडाक्याच्या उन्हामध्ये काटोकाठ पाणी;
उन्हाळ्यात महाराष्टातील एका जिल्ह्यात गंगा अवतरली आहे. काठोकाठ पाणी भरल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कडाक्याच्या उन्हाळ्यात महाराष्टातील या जिल्ह्यात गंगा अवतरली आहे. काठोकाठ पाणी भरल्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे
होळीची सगळीकडे धुम असताना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मध्ये गंगा अवतरली आहे.
गतवर्षीचा कमी पडलेल्या पावसामुळे ऐन मार्च महिन्यात कोकण पाणी टंचाईच्या वणव्यात होरपळत असतानाच फाल्गुन पौर्णिमेला राजापूर येथे गंगेचे आगमन झालंय.
राजापूर येथील पाण्याने भरलेल्या कुंडांचे फोटो सध्या समोर आले आहेत.
सध्या सगळीकडे शिमगोत्सवाची धूम आहे. मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आलेले असताना स्थानिकांसमोर भीषण पाणी टंचाईचे संकट आहे. राजापूर उन्हाळे येथील प्रसिद्ध गंगामाईचे काल आगमन झालं आहे.
काशी कुंडासह गंगा स्थळावरील सर्व चौदाही कुंडांमध्ये पाणी आले आहे, यातील काही कुंडे भरले आहेत.
पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकनां दिलासा देणारा आहे. त्यामुळे आता भाविकांना गंगा स्नानाचा आनंद घेता येणार आहे.