पाण्यात बुडून मायलेकांचा मुत्यु!
जालन्यातील कडवंचीत शेततळ्यात बुडून मायलेकांचा करूण अंत
याची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.
जालना : शेततळ्यात बुडून मायलेकाचा मृत्यू झाला. ही घटना जालना तालुक्यातील कडवंची येथे घडलीय. समाधान माणिक वानखेडे (वय २३) आणि सुमित्रा माणिक वानखेडे (४०) अशी मृत माय लेकराची नावे आहेत. समाधान आणि त्याची आई सुमित्रा दोघे ही सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात गेले होते. मात्र दुपार झाली तरी दोघेही कसे परतले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. मात्र ते कुठेही मिळून आले नाहीत. दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांना शेततळ्यात दोघांचे मृतदेह आढळून आले. यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दोघांचे मृतदेह जिल्हा सामान्य रूग्णालयात आणले. याची माहिती मिळताच जालना तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले.