देशात धनकुबेर वाढले!
देशात 1000 कोटींपेक्षा जास्त संपत्ती असणारे धनकुबेर वाढले, पाच वर्षांत 75 टक्के वाढ
हुरून इंडिया रिच लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. या यादीत भारतातील 1,319 लोकांकडे एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे. प्रथमच भारतात इतक्या मोठ्या संख्येने धनकुबेर वाढले आहेत. यापूर्वी हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये भारतात एक हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारे लोक 216 ने वाढली होती.
भारताची आर्थिक प्रगती वेगाने सुरु आहे. जगात भारताची अर्थव्यवस्था टॉप पाचमध्ये आली आहे. जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थेमध्ये जाण्याकडे भारताची वाटचाल आता होणार आहे. त्याचवेळी देशातील धनकुबेरांची संख्या वाढली आहे. भारतात सुपर रिच म्हणजेच एक हजार कोटींपेक्षा जास्त असणारे धनकुबेर वाढले आहेत. मागील पाच वर्षांत या धनकुबेरांची संख्या 75 टक्के वाढली आहे.
हुरून इंडिया रिच लिस्ट
हुरून इंडिया रिच लिस्ट प्रसिद्ध झाली आहे. या यादीत भारतातील 1,319 लोकांकडे एक हजार कोटींपेक्षा जास्त आहे. प्रथमच भारतात इतक्या मोठ्या संख्येने धनकुबेर वाढले आहेत. यापूर्वी हुरून इंडिया रिच लिस्ट 2023 मध्ये भारतात एक हजार कोटीपेक्षा जास्त संपत्ती असणारे लोक 216 ने वाढली होती. परंतु आता त्यात 76 टक्के वाढ झाली आहे.
भारतीय व्यावसायिकांमध्ये अधिक आत्मविश्वास
भारतीत कोट्यधीश लोकांची संख्या वाढत आहे. त्याबद्दल बोलताना हुरुन ग्लोबलचे अध्यक्ष रुपर्ट हूगवर्फ म्हणतात की, जगातील इतर देशांतील उद्योगपतींपेक्षा भारतीय व्यावसायिक अधिक आत्मविश्वासाने भरलेले आहेत. नवीन वर्ष त्यांना आणखी चांगले जाणार आहे. परंतु दुसरीकडे चिनी व्यावसायिकांसाठी हे वर्ष चांगले जाणार नाही. युरोपमध्येही आशावाद दिसत नाही.