नितीन गडकरी च्या उमेदवारी अर्ज जनतेची तुफान गर्दी
फक्त गडकरी आणि गडकरीच,
महाराष्ट्रातील भाजपाचे लोकप्रिय नेते नितीन गडकरी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरतानाची गर्दी पाहून ही विजयी मिरवणूक आहे, असं तुम्हाला वाटेल. पण असं नाहीय.महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. नागपूरमधून भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भात मतदान होणार आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी आज शक्ती प्रदर्शन केलं. नितीन गडकरी यांच्यासोबत उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल सोबत होते.नितीन गडकरी आज मोठ्या उत्साहात निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी गेले. नितीन गडकरी यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचं आव्हान आहे. नितीन गडकरी हे भाजपाचे राज्यातील बडे नेते आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्यावेळची ही गर्दी पाहून तुम्हाला वाटेल ही विजयी मिरवणूकच आहे.नितीन गडकरी 2024 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकले, तर त्यांची ही सलग तिसरी टर्म असेल. गडकरी सर्वप्रथम 2014 साली लोकसभेची निवडणूक जिंकले. 2019 मध्ये दुसऱ्यांदा ते पहिल्यापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून आलेनितीन गडकरी हे त्यांच्या विकास कामांसाठी ओळखले जातात. नितीन गडकरी यांनी महायुतीच्या सरकारमध्ये असताना मंत्री म्हणून आपल्या कार्याची छाप उमटवली. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बांधला. त्यानंतर आता त्यांनी देशात बरेच महामार्ग, बंदरांच निर्माण केलं आहे.