लोकलमधून निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा घरी गेला मृतदेह
दुर्दैवी घटना
रोजच्या धावपळीत्या जीवनात कधी कोणासोबत काय होईल याचा काही नेम नाही. अशातच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना मुंबईमधून समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यासोबत नेमकं काय घडलं जाणून घ्या.
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा-कोपर स्थानक दरम्यान लोकल ट्रेन च्या गर्दीमुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या एका 25वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा खाली पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास कोपर रेल्वे स्थानकजवळ घडली आहे रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून तो मुंबई पोलीस दलात असलेला ताडदेव येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात कार्यरत होता.नेहमीप्रमाणे डोंबिवलीतून लोकल ट्रेन ने ताडदेव येथे कर्तव्यावर निघालेल्या एका 25वर्षीय तरुण पोलिसाचा लोकलमधील गर्दीच्या रेट्यामुळे पडल्याने बळी गेल्याची घटना बुधवार तारीख 27 मार्च रोजी सकाळी 7.50 च्या दरम्यान घडली. रोहित रमेश किलजे असे या दुर्दैवी पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव असून वडिलांच्या मृत्यू पक्षात तो 2018 मध्ये त्यांच्या जागी सशस्त्र पोलीस बलात नोकरीला लागला होता. रोहितच्या पश्चात आई आणि बहिण आहे. त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे
वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित 2018 मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागला होता तो आई आणि बहिणी सह डोंबिवलीत राहत होता. ताडदेव येथे मुख्यालयात कर्तव्यावर असलेला रोहित डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेन ने प्रवास करून तिथून ताडदेव पर्यंत जात असे. आजही सकाळी 7 वाजून 41 मिनिटांनी डोंबिवली हून निघालेल्या जलद लोकलने तो दादरकडे निघाला होता मात्र ट्रेनमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजातच लटकत होता.कोपर दरम्यान त्याचा हात सुटल्याने तो चालत्या लोकल मधून खाली पडला घटनेची माहिती मिळतात रेल्वे पोलिसांनी तातडीने धाव घेत रोहितला रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्याच्या अशा अकस्मात जाण्याने आई आणि बहिणीचा आधार हिरावला गेला आहे.रोहितच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत टाहो फोडला. दरम्यान त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी चिपळूण येथे नेण्यात आल्याची माहिती डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी दिली.