पॉर्न व्हिडीओ तयार करणारे टोळके गजाआड
लोणावळ्यात पॉर्न ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करत होते व्हिडीओ
१५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यातील व्हीलावर हा सर्व गोरख धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १५ पैकी १३ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील व्हीलावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे. असे असताना ही १५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.