महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे
पावसाबाबत हवामान विभागाचा नवा अलर्ट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाकडून राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं आहे. हवामान विभागाकडून राज्यात उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावासाचा मोठा फटका हा फळबागांना बसण्याची शक्यता आहेपुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे.
पुढील 48 तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकणी जोरदार अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.तर राज्यातील काही भागात उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे.आज विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामनाही करावा लागणार आहे. विदर्भात पावसासोबत हिट वेव्हचा अलर्ट देण्यात आला आहे
दरम्यान त्यापूर्वी शुक्रवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं झालं असून, याचा मोठा फटका हा आंबा, काजू, द्राक्ष आणि इतर फळबागांना बसला आहे.