शरीराने एकमेकींशी जोडलेल्या बहिणी अडकल्या लग्नबंधनात
पतीबरोबरचे फोटो आले समोर
ॲबी आणि ब्रिटनी हेन्सेल या लोकप्रिय सयामी जुळ्या बहिणी आहेत. या दोघी एकमेकींशी जोडलेल्या आहेत. १९९६ मध्ये ‘द ओपरा विन्फ्रे शो’मध्ये झळकल्यानंतर या दोघीही खूप चर्चेत आल्या होत्या. या दोघींनी लग्न केलं आहे. त्यांनी जोश बॉलिंग नावाच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. जोश युनायटेड स्टेट्स आर्मीमधून निवृत्त झाला असून आता नर्स म्हणून काम करतो.
हॅन्सेलच्या फेसबुक प्रोफाईलवर त्यांच्या लग्नाचा फोटो पाहायला मिळत आहे. या दोघी सयामी जुळ्या बहिणींनी जोश बॉलिंगशी लग्न केलं आहे. फोटोत दिसतंय की या दोघींनी पांढरे वेडिंग गाउन परिधान केले आहेत, तर जोश ग्रे सूटमध्ये समोर उभा आहे. फोटोमध्ये ते एकमेकांना मिठी मारतानाही दिसत आहेत.ॲबी व ब्रिटनी हेन्सेल या सयामी जुळ्या बहिणी आहेत. दोघीही एकमेकींशी जोडलेल्या आहेत. ॲबी तिचा उजवा हात आणि पाय नियंत्रित करते, तर ब्रिटनी शरीराची डावी बाजू नियंत्रित करते.