सावधान!
अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जॉइन होत आहात? जळगावात महिलेसोबत घडलं भयानक कांड, 1 कोटी रुपये गमावले
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, महिलेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे. एका महिलेला व्हॉट्सअॅप ग्रुपला जॉइन होण्यास सांगून कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. महिलेसह तिचा पती, सासू आणि नणंदेच्या खात्यामधून देखील रक्कम स्विकारण्यात आली आहे. फसवणूक झाल्याचं लक्ष येताच चार जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनल भीमराव उपलवार असं फसवणूक झालेल्या महिलेचं नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सोनल उपलवार यांना व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपला जॉइन होण्यास सांगितलं. त्यानंतर ट्रेडिंगच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले. पैसे गुंतवण्याच्या नावाखाली उपलवार यांना तब्बल1 कोटी 5 लाख 34 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. सोनल यांचे पती, सासू आणि नणंदेच्या बँकखात्यातून देखील रक्कम उकाळण्यात आली आहे. या ऑनलाईन फसवणुकीप्रकरणी चार जणांविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.