शासकीय रेती डेपोवर कारवाई होणार कधी ?

तहसीलदारांकडून गोकुळसरा रेती साठा सिल ? शासकीय रेती डेपोवर कारवाई होणार कधी ?
रेतीसाठा सील करणे म्हणजे डोक्याचे दुखणे गुडघ्याला पट्टी:
डेपोधारकाला मिळाली ‘खबर‘: पोकलेन घाटाबाहेर….उपसा बंद…..
तालुका प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे: धामणगांव रेल्वे तालूक्यातील रेतीमापीयांचे पोकलेन ने उत्खनन या आशयाच्या बातम्या वृत्तपत्रात प्रसिध्द होताच महसुल विभाग घडबडून जागा झाला असुन तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या पथकाने गोकुळसरा रेतीसाठ्यावर कारवाई करीत साठा सिल केला आहे. दरम्यान सदरची कारवाई ही जिल्हा प्रशासनासमोर बिंग फुटल्याने केली असुन रेती साठा जप्त केल्याने एकंदरीतच कारवाई ही डोक्याचे दुखणे गुडघ्याला पट्टी असल्याचे तालूक्यातुन बोलल्या जात आहे. तर दुसरीकडे सकाळपासुन पोकलेन ने उत्खनन सुरु असलेल्या वाळ डेपोच्या घाटात महसुल विभागाची गुप्त खबर पोहचल्याने उत्खननासाठी वापरला जाणारा पोकलेन तहसीलदार पोहचण्यापुर्वीच पध्दतशीर घाटाच्या बाहेर काढून उभा केला असुन उपसा बंद केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे तहसील कायार्लयात रेती माफीयांचे हस्तक असल्याने निष्पक्ष कारवाई होणार तरी कशी? हा सवाल विचारला जात आहे.
धामणगांव रेल्वे तालूक्यात कर्मचारी सुस्त रेतीमाफीया मस्त व घरकुल धारक त्रस्त असे वृत्त प्रकाशीत होताच आज दुपारी १ च्या सुमारास तहसीलदार गोविंद वाकडे यांच्या बनेतृत्वात तलाठी चव्हाण, उपसरपंच प्रतिक ढाणके यांच्या उपस्थितीत गोकुळसरा २ मधील जिलानी यांनी लिलावाद्वारे घेतलेला तहसील कार्यालयामार्फत आधीच सिल केलेला रेतीसाठा विकण्याची परवानगी दिली असतांना पुन्हा सिल केला. दरम्यान सदर कारवाई विरुध्द अपील करण्याची तयारी जिलानी यांनी सुरु केली आहे. तर दुसरीकडे या सोबतच शासकीय डेपोवर सुरु असलेले पोकलनेचे उत्खनन पहाण्यासाठी चला असे सांगणाऱ्या गावरकयांना तहसीलदारांनीच दमदाटी केल्याचे बोलल्या जात आहे. एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणात निषपक्ष कारवाई होणार का ? हा सवाल उपस्थित झाला असुन रेतीमाफीयांचे तहसील कार्यालयातील हस्तक शोधून घरकुलधारकांना न्याय मिळणार का ? असा सवाल विचारला जात आहे.
—————————————————————-
ही कारवाई म्हणजे ‘डोक्याचे दुखणे घुडघ्याला पट्टी‘
तालूक्यातील रेतीघाटात कुठलीही परवानगी नसतांना पोकलेन च्या सहाय्याने सुरु असलेल्या उत्खननाचा रंगेहात पर्दाफाश करुन कारवाई व्हावी याकरीता उपविभागीय अधिकारी चांदुर रेल्वे यांना रेती घाटातुनच शुक्रवार दि.२९ मार्च रोजी दोन ते तीन वेळा कॉल करुन माहिती दिली असतांना आज तरी शासकीय रेती डेपोवर गुप्त कारवाई होणे गरजेचे होते मात्र तसे न करता तहसील कार्यालयाने जिलानी यांच्यावर कारवाई करीत सिल करण्याचा प्रकार आणि गावकऱ्यांनी मागणी केली असता त्यांनाच दमदाटी करण्याचा प्रकार म्हणजे डोक्याचे दुखणे गुडघ्याला पट्टी असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.
—————————————————————-
आम्ही राजीनामा देऊन घरी बसायचे काय ? रमेश ठाकरे , सरपंच गोकुळसरा
गोकुळसरा स्वंे क्र. १३,१४,१५, मधुन शासकीय रेती डेपो सुरु झाल्यापासुन पोकलेन ने सर्रास उत्खनन करुन नदी पात्रात ४० -४० फुटांचे खोल खड्डे तयार झाले आहे.त सदर च्या कड्यांमध्ये पडून गुराकी तसेच दुसऱ्यांदा गाई म्हशींचा जीव जीव गेला आहे. असे असतांना भविष्यात या खड्यांमध्ये एकादा जीव गेल्यास त्यास जबाबदार कोण हा सवाल आहे तर दुसरकीडे ओव्हरलोड रेती वाहतुकीमुळे गोकुळसरा बोरगांव रस्ता पुर्णत: उखडला असल्याने सरपंच म्हणून लोक आम्हाला जबाबदार धरतात असे असतांना हेतुपरस्पर कारवाई होत नसेल तर आम्ही राजीनामा देऊन घरी बसायचे काय ? असा सवाल गोकुळसरा येथील सरपंच रमेश ठाकरे यांनी विचारला आहे.
————————————————————-
जुन्या साठ्याव्यतिरीक्त नवीन साठा केला सिल: आकाश चव्हाण
गोकुळसरा २ मधुन जुन्या साठ्या व्यतिरीक्त नवीन उत्खनन सुरु असल्याच्या माहितीवरुन तपासणी केली असता नवीन साठा आढळून आल्याने साठा सिल केला असुन कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे. असे तलाठी आकाश चव्हाण यांनी सांगितले
————————————————————-

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या