आरोग्यदायी कलिंगड
कलिंगडाच्या बियांचे 5 फायदे माहितीये? पुरुषांच्या ‘या’ समस्येवर आहे रामबाण उपाय
कलिंगड सर्वांच्याच आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचावासाठी हे रामबाण असते. कलिंगड खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड तर राहतंच, सोबतच गारवाही मिळतो. मात्र आज आम्ही तुम्हाला कलिंगडाच्या बियांचे काही जबरदस्त फायदे सांगत आहोत. चला पाहूया याचे फायदे.कलिंगडाच्या बिया आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहेत. हेल्थलाइनच्या मते, कलिंगडाच्या बियांमध्ये लोह आणि जस्त सारखे अनेक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. चला पाहूया कलिंगडाच्या बियांचे काही जबरदस्त फायदे.प्रजनन समस्या सुधारते : कलिंगडाच्या बियांमध्ये झिंक आढळते. कलिंगडाच्या बिया खाल्ल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढते, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते. उच्च शुक्राणूंची संख्या आणि त्याची गुणवत्ता प्रजननक्षमतेसाठी खूप महत्त्वाची आहे. कलिंगडाच्या बियांमध्ये असलेल्या झिंकमुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते
लोहाचा चांगला स्रोत : कलिंगडाच्या बिया लोहाचा खूप चांगला स्रोत मानल्या जातात. मूठभर कलिंगडाच्या बियांमध्ये सुमारे 0.29 मिलीग्राम लोह असते. लोह हा हिमोग्लोबिनचा एक महत्त्वाचा घटक आहे.
हाडांसाठी फायदेशीर : कलिंगडाच्या बिया हाडांसाठी खूप चांगल्या मानल्या जातात. यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, प्रोटीन, झिंक, फोलेट, पोटॅशियम आणि कॉपर मुबलक प्रमाणात आढळतात. आपण त्यांना नैसर्गिक मल्टीविटामिन मानू शकता. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये जास्त कॅलरीज नसतात. म्हणून या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
पचनसंस्थेसाठी फायदेशीर : कलिंगडाच्या बिया पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय मधुमेहाशी लढा देण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी कलिंगडाच्या बिया खाल्ल्या जाऊ शकतात
त्वचेची काळजी घेतात : कलिंगडाच्या बिया खूप उपयुक्त आहेत. याच्या बिया बारीक करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा तजेलदार दिसते. कलिंगड चेहऱ्यावर चोळल्याने चमक येते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात. याशिवाय टरबूजाच्या बियांच्या पेस्टने डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.