मोठी बातमी!
रायगडमध्ये शिवशाही बसचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू
रायगडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई -गोवा महामार्गावर माणगावमध्ये हा अपघात झाला आहे. ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला आली असताना हा अपघात झाला. दरम्यान घटनेचीमाहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे. बसचं देखील नुकसान झालं आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजीक शिवशाही बस आणि रिक्षामध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगाव येथील मानस हॉटेल समोर आली असता रिक्षा आणि या बसमध्ये अपघात झाला. सकाळी साडआकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.