200 कोटींची संपत्ती दान करुन पत्नीसह संन्यास, गुजरातच्या उद्योगपतीची देशभरात चर्चा

गुजरातच्या उद्योगपतीची देशभरात चर्चा
भावेश यांनी संसाराचा मोह सोडून आपली जवळपास 200 कोटींची संपत्ती दान केली आहे. त्यांनी बिल्डिंग कंस्ट्रक्शनचा व्यवसायासह अहमदाबाद येथील कामकाज सोडून अचानक दीक्षार्थी बनण्याचा निर्णय घेतला आहे.आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे, असं आपण मानतो. पैसा आहे तर सर्व काही आहे. पैसा असल्यावर आपल्याला आपलं मनासारखं आयुष्य जगता येतं. आपली स्वप्न पूर्ण करता येतात. हवी ती कार, हवी ती बाईक घेता येते. आपली इच्छा असेल तिथे फिरता येतं. स्वर्गासारखं आयुष्य जगता येऊ शकतं. पण काही माणसं फार वेगळे असतात. त्यांना भौतिक सुखांचा मोह नसतो. त्यांना ऐहिक वैभवाची गरज वाटत नाही. त्यामुळे ते फार शाश्वात आयुष्य जगण्याचा विचार करतात. त्यांना दुनियादारीशी फार घेणंदेणं वाटत नाही. त्यांना परमेश्वराशी एकरुप व्हावसं वाटतं. परमेश्वराची सेवा करावीशी वाटतं. देवाच्या नामस्मरणात तल्लीन व्हावसं वाटतं. यासाठी ते आपल्याकडच्या सर्व संपत्तीचा त्याग करायलाही तयार असतात. गुजरातच्या एका श्रीमंत उद्योगपतीने तसंच पाऊल उचललं आहे. गुजरातचे उद्योगपती भावेश भाई यांनी आपल्या 200 कोटींची संपत्ती दान करत संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहेगुजरातच्या साबरकांठा जिल्ह्याच्या हिंमतनगर येथे वास्तव्यास असणारे उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांच्या पत्नी या दाम्पत्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. भावेश यांनी आपल्या कोट्यवधीची संपत्ती दान केली आहे. त्यांनी संसाराच्या मोहाचा त्याग केला आहे. भावेश हे संपन्न कुटुंबात जन्मले आहेत. त्यांचं सर्व सुख-सोयी सुविधांमध्ये पालनपोषण झालं आहे. त्यांची जैन समाजात अनेकदा दीक्षार्थी आणि गुरुजनांसोबत भेट व्हायची. विशेष म्हणजे भावेश भाई यांचा 16 वर्षाचा मुलगा आणि 19 वर्षाच्या मुलीने दोन वर्षांआधीच सर्वसाधारण आयुष्य जगण्याचा आणि दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या मुलांच्या निर्णयानंतर दोन वर्षांनी भावेश आणि त्यांच्या पत्नीनेही दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य संपादक राहुल गौतम

Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या