मुंबईमध्ये शासकीय कार्यालयाला लागली भीषण आग
निवृत्ती वेतन विभागाच्या या कार्यालयाच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला लागली आग लागली आहे.लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना मुंबईतील एका कार्यालयामध्ये आगीची घटना घडली आहे. बीकेसी परिसरातील एका सरकारी कार्यालयाला भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीकेसी परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग लागली आहे. आज संध्याकाळी ही घटना घडली आहे.